राज्यस्तर शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा येथील खेळाडूंची चमकदार कामगिरी

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज – सातारा क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, ॲमेच्युअर पावर लिफ्टिंग असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धा ,दिनांक २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी रोजी सातारा येथे श्रीमंत शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या सदर स्पर्धेमध्ये लोणावळा येथील व्हि. पी. एस.हायस्कूल व डी. पी. मेहता जूनियर कॉलेज आणि पुरंदरे हायस्कूल येथे शिकत असलेल्या तर शिवदुर्ग फिटनेस,नांगरगाव च्या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये कुमारी तपस्या अशोक मते,प्रीती दुडे,ज्ञानेश्वरी साबळे, निशांत कंधारे आणि जागृत भेसानिया या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. १७ वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेत तपस्या अशोक मते ५२ कि.गट सुवर्णपदक (व्हि.पी.एस् हायस्कूल व डी.पी.मेहता ज्युनिअर कॉलेज)प्रीती निवृत्ती दुडे ४७ कि.गट सुवर्णपदक (व्हि.पी.एस्. हायस्कूल व डी.पी.मेहता ज्युनिअर कॉलेज)ज्ञानेश्वरी साबळे ६९ किलो चतुर्थ क्रमांक (पुरंदरे हायस्कूल)एकोणीस वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत निशांत कंधारे ५९ कि.गट पाचवा क्रमांक (व्हि.पी.एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज)आणि जागृत भेसानिया ६६कि.गट (व्हि.पी.एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज) याने कांस्यपदक मिळवले. तसेच या *स्पर्धेचे आकर्षण असलेला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा मानाचा किताब तपस्या अशोक मते हिने मिळविला*. खेळाडूंना सौ. रेवती बोके मॅडम (शिक्षीका: व्हि.पी.एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज) आणि सौ. ज्योती कंधारे (एशियन चॅम्पियन) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. *सर्व खेळाडू *शिवदुर्ग फिटनेस येथे अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत*. संपर्क:९७६२१७०९६८*तपस्या मते आणि प्रीती दुडे ह्या दोघींची शालेय राष्ट्रीय पावरलिफ्टींग स्पर्धेसाठी* निवड करण्यात आली आहे. खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page