*लोणावळा महाविद्यालय येथे २९ डिसेंबर ला ५३ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य,विज्ञान वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा,पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ व मावळ तालुका माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजीआयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात मावळ परिसरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मावळचे आमदार माननीय सुनील (अण्णा) शंकरराव शेळके व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच समारोपप्रसंगी माजी राज्यमंत्री श्री संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी , लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच लोणावळा परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनास लोणावळा परिसरातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी आवाहन केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page