लायन्स क्लब लोणावळा–खंडाळाचा गौरवशाली कामगिरीचा ठसा,जिल्हा पातळीवरील अनेक पुरस्कार








मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांची सामाजिक कार्याची उल्लेखनीय कामगिरीचा भहूमान करत लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ – डी २ च्या द्वितीय तिमाही पुरस्कार समारंभात अनेक मानाचे पुरस्कार पटकावले. प्रामुख्याने क्लबला प्रतिष्ठेचा “बेस्ट क्लब एक्सलन्स अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. अधयक्ष कांता ओसवाल सचिव निराली नालेकर व खजिनदार अश्विनी कदम यांनी पुरस्कार स्वीकारला व एमजेएफ देवल पारेख यांना “बेस्ट झेड.सी अवॉर्ड”, लायन विरल गाला यांना “बेस्ट कॅबिनेट मेंबर अवॉर्ड” देण्यात आला. याशिवाय लायन डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पोपट ओसवाल, आर्किटेक्ट विरेंद्र पारेख, अँड प्रफुल्ल लुंकड, देवेंद्र नालेकर आणि निराली नालेकर यांना समाजासाठी केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी “बेस्ट सर्व्हिस अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मानवसेवा व ‘जीवदया’ उपक्रमांमधील सातत्यपूर्ण कार्याबद्दल सर्व मान्यवरांचा जिल्हा राज्यपाल लायन राजेश अग्रवाल व त्यांच्या टीमतर्फे सत्कार करण्यात आला. या यशामुळे लायन्स क्लब लोणावळा–खंडाळाचा सामाजिक क्षेत्रातील लौकिक अधिक उंचावला असून परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



