महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीने खोंडगेवाडी येथे ८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप



मावळ मराठा न्यूज़:-लोणावला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या वतीने खोंडगेवाडी येथे ८० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात लोणावळा शहराध्यक्ष श्री.भारत रमेश चिकणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. ह्या कार्यक्रमाची संकल्पना शहर उपाध्यक्ष श्री.मधुर गिरीधर पाटणकर यांची होती. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरामध्ये छत्रपती शिवराय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.गुलाब मराठे,विश्वस्त,श्री.गिरीधर पाटणकर,विश्वस्त श्री.नरेश खोडगे, राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष श्री.विलासभाऊ बडेकर,शिवसेना शहर प्रमुख श्री.संजय भोईर,श्री.यशवंत काका पायगुडे -प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,श्री.अभयजी पारख ,अध्यक्ष व्यापारी आघाडी भारतीय जनता पार्टी,श्री.उमेशजी बोडके प्रसिद्धी प्रमुख लोणावळा शहर मनसे,श्री रोहिदास शिंदे रायवुड विभाग अध्यक्ष,श्री.लहू गायकवाड,श्री.सुधीर कदम,श्री.अजय भोईर,श्री.धीरज कदम,श्री.सुधीर पाटणकर,श्री.वैभव पाटणकर,श्री.कुलदीप पाटणकर आणि महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.




