गोसेवेचा प्रेरणादायी उपक्रम :लायन्स क्लब कडून या कार्याला मदतीचा हात

मावळ मराठा न्युज – कामशेत,मावळ परिसरात गोसेवेचा अजून एक सुंदर व प्रेरणादायी उपक्रम पार पडला श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाजसेवा धर्मादाय न्यास संचलित श्रद्धा गौशाळा प्राणजपोल,ताजे (कामशेत) यांनी सदर उपक्रम निमित्त या कार्यास मोठी देणगी दिलीं तसेच या समारंभानिमित्त निधी संघवी व इतर यांचे तर्फे भरीव देणगी प्रदान करण्यात आली. ही गौशाळा जैन जीवदया न्यास तसेच लायन विरल गाला व लायन दीपाली गाला यांच्या पुढाकारातून उभारण्यात आली आहे.यावेळी लायन्स क्लब लोणावळा खंडाळा अध्यक्ष कांता ओसवाल यांनी देणगी देऊन या कार्यास हातभार लावला लायन अमित लुनावत यांनी आपल्या वडिलांच्या ५० व्या सुवर्ण विवाहदिनानिमित्त गौसेवेसाठी देणगी अर्पण केली. कार्यक्रमास जिल्हा राज्यपाल लायन राजेश अग्रवाल यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच केदारी परिवार त्यांच्या गोसेवा, जीवदया व समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.या प्रसंगी लायन डॉ. पोपटलाल ओसवाल, अ‍ॅड. प्रफुल लुंकड, नंदकिशोर खंडेलवाल, मनोज लुंकड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.गोसेवा व जीवदया या पवित्र कार्यासाठी मंडळाचा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय ठरला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page