टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने २०२८ पूरग्रस्तांना १ कोटी ७० लाखाचा धनादेश लोणावळा नगरपरिषदेला सुपूर्द

टाटा कपंनी लोणावळा नगरपरिषदेला धनादेश देताना
लोणावळा नगरपरिषद येथे पत्रकार परिषद

मावळ मराठा न्युज -लोणावळा -लोणावळा शहरात दिनांक ०६/०८/२०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून टाटा कंपनीला विनंती करण्यात होती त्याचा पाठपुरावा देखील मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुढी यांचे सोबत बैठाका घेतल्या होत्या.लोणावळ्यात अतिवृष्टीमुळे जवळपास २०२८ कुटुंब बाधित झाली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने आज दिनांक २९ ऑक्टोबर,२०२६ रोजी सामाजिक बांधिलकीतून दी टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सदर बाधित कुटुंबांसाठी पहिल्या टप्प्यात आर्थिक मदत म्हणून रुपये १,७०,००,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी सत्तर लाख फक्त) मंजूर करण्यात आले. टाटा कंपनी च्या वतीने महंबळे आणि सौरभ उपाध्याय यांच्या हस्ते मदतीचा धनादेश हा लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे,उपनगराध्यक्ष देविदास कडू यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरसेवक जीवन गायकवाड,नगरसेवक सनी राम दळवी,सनी घोणे,नगरसेविका रेश्मा पाठारे,सना चौधरी,वैशाली मोगरे,प्रियांका कोंडे,मंगेश अगरवाल,मारोती तिकोने आदी मान्यवर उपस्थित होते.यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.टाटा कंपनी ने १ कोटी ७० लाख ही सर्व रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने वितरित करावी. रक्कम वितरणाचा लाभार्थी निहाय तपशील व त्यासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा अशी सूचना लोणावळा नगरपरिषदेला केली आहे.
लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे आणि उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी महाराष्ट्र शासन यांचेकडून देखील २०२८ पूरग्रस्ताना दिवाळी पूर्वी प्रत्येकी १० हजार रुपये दिले जातील अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. नगरसेवक जीवन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेनंतर सर्वांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page