पीएमपीएल बसची होंडा शाईन मोटार सायकलला धडक;युवकाचा जागीच मृत्यू






मावळ मराठा न्युज -लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मिन गॅरेज चौकात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. पीएमपीएल बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, मृत तरुणाची ओळख पुण्यात -औंध परिसरातील रहिवासी म्हणून झाली आहे.मृताचे नाव अविनाश दत्तात्रय काळे (वय ३०, रा. कस्तुरबा झोपडपट्टी, गणेश खिंड, औंध, पुणे) असे आहे. याप्रकरणी अक्षय दिगंबर काळे (वय २६,रा. वारजे, पुणे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, बसचालक प्रमोद शिवाजी पोळ (वय ३५, रा. कराड, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश काळे हा त्याच्या होंडा शाईन (MH-12/L 7533) या मोटारसायकलवरून पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. सकाळी सव्वासहाच्या सुमारास निघाला होता. सकाळी सव्वासहाच्या सुमारास लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरातील मिनु गॅरेज चौकात उतारावर असताना, निगडीकडे जाणाऱ्या पीएमपीएल बस (MH-14/HU-5525) ने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अविनाश बसच्या मागील चाकाखाली गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हवालदार देविदास चाकणे हे पुढील तपास करीत आहेत.




