लोणावळ्यात चोरांचा सुळसुळाट,एकाच रात्री पाच दुकानें फोडून चोरी! १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दि ३१ लोणावळा शहरातील भांगरवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच दुकानांना लक्ष्य केले. लोणावळा ते भांगरवाडी रस्त्यावरील इंद्रायणी नगर येथील गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समधील दुकानांचे शटर अर्धवट उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह कपडे, बूट आणि घड्याळे असा एकूण १ लाख ३० हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समधील सत्यम फॅशन शूज, क्रेज बुटीक, चैतन्य चाट, पार्टी बलून हब आणि मी अँड मॉम या पाच दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर अर्धवट उचकटून आत प्रवेश केला.यामध्ये सत्यम फॅशन शूज दुकानातील ६० हजार रुपये रोख रक्कम आणि १५ जोड बूट असा ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. क्रेज बुटीकमधून १०० घड्याळे, शर्ट, टी-शर्ट, पँट आणि जॅकेट असा सुमारे ३८ हजार ४०० रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. तसेच पार्टी बलून हब या दुकानातील २५ हजार रुपये रोख रक्कमही चोरट्यांनी चोरून नेली.या प्रकरणी शुभम सुनील शिंदे (वय ३०, रा. दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आव्हानएकाच कॉम्प्लेक्समधील पाच दुकानांनामध्ये झालेल्या या चोरी संदर्भात तेथील सीसीटीव्ही फूटेज महत्वाचे ठरणार आहया गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page