लोणावळ्यात पुढील आठवड्यात होणार २१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन -आमदार सुनील शेळके यांची पत्रकार परिषदेत माहिती

आमदार सुनील शेळके यांची पत्रकार परिषद

लोणावळा -लोणावळ्यात २१ कोटींच्या विकासकामांचे पुढील आठवड्यात भूमिपूजन,पुढील दोन महिन्यांत ३५ ते ४० कोटींच्या पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांना सुरुवात;१५ नोव्हेंबर नंतर अतिक्रमणांवर कारवाई,२,०२७ पूरग्रस्त कुटुंबांना ३० हजार रुपये मदतीचे नियोजन सहारा पूल परिसरात ४ -६ कोटींचे सुशोभीकरण अश्या विविध विकास कामाची माहिती देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद येथे दिनांक ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. विविध विकास कामांबद्दल माहिती देताना आमदार सुनील शेळके यांनी सहारा पूल परिसरात ४ -६ कोटींचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच लोणावळा शहरातील विविध प्रभागात २१ कोटींची विकासकामांचे भूमिपूजन पुढील आठवडयात लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर पुढील दोन महिन्यांमध्ये शहरातील महत्त्वाच्या पाच रस्त्यांच्या कामांना ३५ ते ४० कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चासह सुरुवात करण्यात येणार असून, १५ नोव्हेंबरनंतर शहरातील अतिक्रमणांवर कडक कारवाईची मोहीम राबविली जाणार असल्यांचेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच २,०२७ पूरग्रस्त कुटुंबांना ३० हजार रुपये मदतीचे नियोजन देखील करण्यात आल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. ७ जुलै च्या मान्सून काळात झालेल्या पुरामुळे बाधित झालेल्या २,०२७ कुटुंबांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुदानामुळे पूरग्रस्त कुटुंबांना पुनर्वसनात मदत होणार असून, लवकरच पूरग्रस्त यांना ५ नोव्हेंबर पूर्वी खात्यात पैसे वितरित केले जातील असेही शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २८ जानेवारीला होणारी पुणे ग्रँड टूर या वेळी लोणावळ्यातून आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे लोणाळ्याच्या पर्यटनाला चालना मिळेल आणि शहराची राष्ट्रीय पातळीवर ओळख चांगली ओळख निर्माण होणार असल्याचे यावेळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.यावेळी नगर परिषद पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page