जाई वात्सल्य फाउंडेशन आणि वाळंज परिवार आंबवणे यांच्या वतीने मुळशी धरणभागातील १२०० विद्यार्थ्यांना स्वछता किट,दिवाळी खाऊवाटप

मावळ मराठा न्युज -आंबवने, गेल्या १२ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.जाई वात्सल्य फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ वत्सलाताई यांच्या कल्पनेतून पोमगाव,मुळशी धरण प्रशाला,मुळापूर, कुंभेरी, कोळवली, विसाघर, देवघर, गेळदांड, जांभूळणे, नांदगाव, पेठशहापूर, आंबवणे, सालतर,माजगाव तैलबैल, भांबर्डे, एकोले, आंबेडकर नगर घुटके, संपर्क संस्था,बारपे, तिस्करी आणि सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय. या सर्व शाळेतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छता किट आणि दीपावली खाऊ चे वाटप करण्यात आले. तसेच स्वछता व पाणी बचतीचे महत्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमात जेष्ठ समाजसेवक मा. श्री नंदकुमार वाळंज यांनी सर्वं विद्यार्थ्यांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.वाळंज विद्यालयातील शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page