पिंपरी चिंचवडचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे मुंबई येथे”मी मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार २०२६”ने सन्मानित








मावळ मराठा न्युज- मुंबई-दि.०१.०३.२०२६ मुंबई येथे बाळ दंडवते सभागृह , म्युनिसिपल मजदुर इमारत , बावला मस्जिद समोर , महाराष्ट्र हायस्कूल मैदान , करीरोड येथे मी मराठी लोक चळवळ अभियान , मैत्री संस्था व उत्प्रेरक फाऊँडेशन आयोजीत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मी मराठी निमंत्रितांचे कवी संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमा मध्ये समाजामध्ये धार्मिक , क्रिडा , सांस्कृतिक , पत्रकारिता , राजकिय , पर्यावरण , साहित्यिक , उद्योग , सहकार , शैक्षणिक , आरोग्यविषयक , कृषी , दिव्यांग कार्य , संशोधन , विज्ञान , तंत्रज्ञान , अशा अनेक विविध सामाजिक उत्कृष्ट व उल्लेखनिय कार्य म्हणून सामाजिक सेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व असणारे कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना संस्थेच्या वतीने ” मी मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार २०२६ ” सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , शाल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मातृतिर्थ शिंदखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे १४ वे वंशज आणि राजमाता माॅ साहेब जिजाऊ यांचे थेट १४ वे वंशज मा. संभाजीराव राजे जाधवराव , प्रसिद्ध अभिनेत्री , व प्रवर्तक मराठी शाळा वाचवा अभियान मा. चिन्मयी सुमित , कै.शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्षा मा. चारुशिला देशमुख यांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी फिल्म सँसॉर भारत बोर्डाचे मा.सदस्य मा.विलास खानोलकर , उत्प्रेरक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.संतोष काबळे , आदर्श शिक्षिका मा.स्पृहा सुरेश इंदु , जेष्ठ शिक्षण तज्ञ मा.मंगला परब उपस्थित होते.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी मैत्री संस्थेचे अध्यक्ष मा.सुरज भोईर व त्याच्या संपुर्ण टीमने भरपुर प्रयत्न केलेकार्यक्रमाला , पुरस्कार्थी , कवी व त्याच्या नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.



