वलवण धरणावर १२ मित्रांसोबत फिरायला आलेल्या १७ वर्षीय निलेश शिंदे चा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश

मावळ मराठा न्युज – लोणावळा,निलेश शिंदे राहणार कासरवाडी पुणे,अंदाजे वय १७ वर्ष हा त्याच्या १२ मित्रांबरोबर लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली येथून वलवण धरणाच्या बाजूला ते गेले. व पोहायला पाण्यात उतरला व पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कु टिम ला फोन आल्यावर लगेचच टीम सर्व साहित्यानिशी घटनास्थळी हजर झाले व पाणबुडीच्या साहाय्याने मृतदेह शोधून बाहेर काढला .यात वैभव दुर्गे,योगेश दळवी,मयुर दळवी,सागर दळवी,कपिल दळवी, आकाश मोरे,रोहित मोरे,महेश मसने,कुणाल कडु, महादेव भवर,पिंटु मानकर,सतिष सगर, सुनिल गायकवाड,यांचा आजची टीम मध्ये समावेश होता.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page