२५ एप्रिल जागतिक हिवताप दिनानिमित्त लोणावळा शहरांमध्ये जनजागृती रॅली संपन्न



मावळ मराठा न्युज – (शिल्पा येवले)लोणावळा,२५ एप्रिल जागतिक हिवताप दिनानिमित्त लोणावळा शहरामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र, लोणावळा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील, उपजिल्हा रुग्णालय लोणावळा येथील वैदकीय अधीक्षक डॉ. भाग्यश्री पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे मॅडम,प्राथमिक आरोग्य केंद्र कार्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वाघमारे व डॉ. दत्ता तपसे, लोणावळा नगर पालिका स्वच्छता निरीक्षक काटकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा व खंडाळा शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले, गप्पी माश्याचे महत्व सांगण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत विविध घोषणा देण्यात आल्या व माहिती दर्शक फलक दाखविण्यात आले. खंडाळा येथील न. पा. शाळेतील विद्यार्थ्याना कीटकजन्य व जलजन्य आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची माहितीपर व्हिडिओ देखील दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांना परिसर व वयक्तिक स्वच्छतेचे महत्व देखील सांगण्यात आले.




