लोणावळा महाविद्यालयात ११ मार्च रोजी फन फेअर चे आयोजन






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित वळवण येथील लोणावळा महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, उद्योजकता आणि टीमवर्क विकसित करण्याच्या उद्देशाने ‘फन फेअर’ या आकर्षक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे.या फन फेअर मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध प्रकारच्या चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच मनोरंजनात्मक आणि कौशल्यवर्धक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोणावळा शहरातील सर्व नागरिक व सर्व आजी-माजी विद्यार्थी व पालक यांना सहभागी होऊन चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच खेळांचा आनंदही घेता येणार आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन, व्यवस्थापन कौशल्य आणि संघभावना यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह द्विगुणित होण्यास मदत होईल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण होऊन त्यांना भविष्याकरिता प्रेरणा मिळते.तरी लोणावळा शहरातील सर्व नागरिक, सर्व आजी व माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी फन फेअर ला आवर्जून उपस्थित राहावे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेत त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. धनश्री पाध्ये यांनी केले आहे.



