जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने योग शिबीराचे आयोजन

मावळ मराठा न्युज :- आज जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुक्ष्म योगा फौंडेशनचे पंकज शर्मा व हिमांगी वार्षने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगप्रकार करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाघिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारताने जगाला दिलेल्या काही अमुल्य भेटींपैकी एक म्हणजे ‘योग’ हे आहे. जागतिक स्तरावर स्वीकारले गेलेले, भारतीय संस्कृतीचे हे एक महत्त्वाचे प्रतिक आहे. निरोगी शरीर आणि प्रसन्न मनासाठी सर्वांनी दैनंदिन योग करून, आपले आरोग्य जपावे.यावेळी सर्वाना जागतिक योग दिन निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page