जागतिक महिला दिन जगात उत्साहात साजरा,पण लोणावळ्यात खिदपत पडलेली “ती” मात्र उपेक्षित

मावळ मराठा न्युज – अनिता जालंदर साखरे नावाची महिला नांदेड. परभणी वय साधारण ५५ वर्ष,हया पुरंदर ग्राउंड वॉकिंग ट्रकच्या बाजुला एक आठवडा पडुन होत्या त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे त्यांना बसता उठता येत नव्हते. तरी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन होता, संध्याकाळी पुरंदर शाळेच्या कोपऱ्यावर विवस्त्र आवस्थेत होत्या यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पाडुरंग तिखे यांनी लोणावळा पोलीस स्टेशनला जाउन लेडिज ठाणे अंमलदार यांना याबाबत माहीती दिली.त्या ताबडतोब माझ्या बरोबर येउन त्यांना त्यांच्या अंगावर कपडे टाकले आणि त्यांना -झाडाखाली सावलीत उचलुन ठेवले. त्यावेळेस आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे व तिखे यांनी ताबोडतोब डॉ. सिमा शिंदे यांना फोन केला. त्या रुग्णावाहीका घेऊन दोन नर्सना घेउन आल्या नंतर त्या महिलेला तपासणी आणि चौकशी केली तेव्हा त्या महिलेला पायावर गंभीर जखम आढळून आली नंतर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन रितसर तक्रार आणि माहिती देऊन १०८ नंबर वरून रुग्णवाहीका मागवली,लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक दत्तात्रय येवले यांनी लोणावळा पोलीस स्टेशन वरून पोलीस स्टेशनचे पत्र व सोबत पोलीस कॉन्स्टेबल बरोबर घेऊन सदर आठवडाभर खितपद बेवारस पडलेल्या त्या महिलेला ससुन हॉस्पीटलला पुढील इलाज आणि कारवाई साठी पाठवून खऱ्या अर्थाने डॉ.सिमा शिंदे,प्रकाश पाठारे,दत्ता येवले आणि पांडुरंग तिखे यांनी खरा महिला दिनाची जाणीव समाजाला करून दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page