१२ जानेवारीचे लोणावळ्यातील रेलरोको आंदोलन जनहितासाठीच : सर्वांची निर्दोष मुक्तता



मावळ मराठा न्युज :- लोणावळा,जागरूक नागरिक लोणावळा ह्यांनी केलेल्या रेल रोको आंदोलन मध्ये गुन्हे दाखल झाले होते ,त्यात आज रेल न्यायालयाने आज सर्व आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी,गोर गरीब,कष्टकरी,नोकरदार शाळकरी मुलांच्या न्याय्य हक्कासाठी लोणावळ्यातील जागरूक नागरिक यांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान लोणावळा रेल्वे स्टेशन,फ्लॅट फॉर्म नंबर २ वर डेक्कन क्वीन ला अडविण्यात आले होते त्यावेळी लोणावळ्यातील जागरूक नागरिक च्या २५ जणांवर रेल्वे विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्याची सुनावणी आज झाली त्यात सर्वांना निर्दोष ठरवविण्यात आले.शेवटी सत्याचा विजय होत असतो.सामूहिक हितासाठी दिलेला लढा कधीही व्यर्थ आणि बेकायदेशीर असूच शकत नाही असाच आजच्या निकालाने सिद्ध केले आहे.




