नाट्यसंमेलनाच्या भव्य प्रारंभाप्रमाणेच सांगताही दिमाखदार होणार- आमदार,सुनील शेळके

मावळ मराठा न्युज:- तळेगाव, मोठी परंपरा असलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता तळेगाव व मावळात होत आहे. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. नाट्यसंमेलन ज्या भव्यतेने साजरे झाले त्याची सांगताही त्याच दिमाखात साजरी करण्याचाच आमचा प्रयत्र राहील. त्यादृष्टीने येत्या बुधवारी (दि २४ जानेवारी) होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या होणाऱ्या कार्यक्रमास मावळ व पुणे जिल्ह्यातील नाट्यरसिक आणि समस्त नागरिकांनी उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा असे आवाहन मावळचे आमदार श्री सुनील शेळके यांनी केले.वरील कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या मंडपाचे भूमिपूजन तसेच व्यासपीठ व प्रवेशद्वाराचे नामकरण आज संपन्न झाले. मावळचे आमदार श्री सुनील शेळके, नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त सुरेश सास्त्रवळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, पिंपरी चिंचवडचे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कलापिनीचे नाट्य परिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे तसेच तळेगावातील युवा नेते गणेश खांडगे, जेष्ठ नेते बबनराव भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यासमवेत समारंभस्थळी शुभारंभाची कुदळ मारून, श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम संपन्न झाला.या मुख्य कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार श्री शेळके यांनी या कार्यक्रमाचे औचित्य राखीत नाट्यरसिकांना वरील आवाहन केले, या दोन्ही कार्यक्रमांना वरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी श्री भाऊसाहेब भोईर यांनी तळेगाव नगरी ही सर्व कला चळवळीची गंगोत्री असून येथील जेष्ठ कलाकार, मान्यवर संस्था म्हणजे आमची विद्यापीठे आहेत. त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. त्यांचे ऋण मानूनच भविष्यात नाट्यसंकुल व विविध कलांना सामावून घेणारे कलामंदिर निर्माण करता येईल का, असाच आमचा प्रयत्न असेल असे स्पष्ट केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page