महिला दिन रंगे आनंद ज्येष्ठ नागरिक महिला संगे; आनंद ज्येष्ठ नागरिक संघ ,पोस्टल कॉलनी वाकड येथे महिला दिन उत्साहात साजरा








मावळ मराठा न्यूज नेटवर्क – वाकड दि.१० प्रतिनिधी रविवार ८ मार्च रोजी आनंद ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साधारण ९० महिला एकत्रित आल्या होत्या. सभेमध्ये महिला दिनाचे महत्व आणि सक्षम विविध क्षेत्रातील कार्यरत महिला बद्दल विशेष माहिती घेण्यात आली. संघर्ष आणि जिद्द ही प्रत्येक स्त्रीची ओळख! यशाच्या शिखरावर तिचीच चाहूल स्पष्ट असते.स्त्रीशक्तीला वंदन करू या !महिला दिनी करूया महिलांचा आदर .ती आई, ताई, मैत्रिण, पत्नी, मुलगी, ती माया आहे ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सर्व व्यर्थ आहे जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा संघर्षाचा आणि योगदानाचा गौरव साजरा करण्यासाठी केला जातो. ती केवळ एकाच कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची शक्ति आहे. ती अनेक भूमिका पार पाडत असताना समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देते. सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत महिला मंडळ प्रमुख अलकाताई कळमकर,मीरा बोरकर, पुष्पा ढवळे, चित्रा बराटे, संगीता साठे, प्रतिभा गवळी,हेमांगी बोंडे, निर्मला झोपे, विजया चौधरी, विभा दरेकर ,सुनिता सफाई, वृषाली देसाई. यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता श्रीराम वडापाव येथे अल्पोपाहार व चहापानाने झाली.



