जि.प.प्राथमिक शाळा,वेहेरगाव शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा

मावळ मराठा,कार्ला, जि.प.प्राथमिक शाळा,वेहेरगाव शाळेचा दिनांक ०१/०३/२०२५ रोजी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. याकार्यक्रमाला वेहेरगावच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रांमध्ये उत्तुंग कार्य करीत असलेले मान्यवर व्यक्ति सहभागी झाल्या होत्या. शाळेचे माजी विद्यार्थी तसेच ज्या ज्या शिक्षकांनी या पवित्र वास्तूत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले असे सर्व माजी शिक्षक कार्यकमासाठी उपस्थित होते. तसेच सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी गावकरी सर्व पालकवर्ग,मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा व्यवस्थापन,व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य आजच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. आज सर्वच सदस्यांनी या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ देऊन खऱ्या अर्थाने कार्यक्रम एका उंचीवर नेला. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवर व्यक्तिंचे शाळेतर्फे स्वागत आभार व्यक्त मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page