राजमाची गार्डन,खंडाळा येथे मगनलाल चिक्कीचा शॉप मध्ये घुसलेल्या भेकरला रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडले


मावळ मराठा न्युज :-खंडाळा, आज दिनांक १६ मार्च शनिवार रोजी सकाळी १०:३० शिवदुर्ग टीम यांना कॉल आला कि राजमाची गार्डन, खंडाळा येथे मगनलाल चिक्कीचा शॉप मध्ये भेकर आलेला आहे. सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदस्य तिथे स्पॉटवर पोहोचलो फॉरेस्ट ऑफिसर आधीच पोहचले होते. मगनालाल चिक्की शॉपमधून भेकरला सुखरूप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.यावेळी शुभम कुंभार, राहुल दळवी व फॉरेस्टचे मोरे घटना स्थळी उपस्थित होते.स्थानीक दुकानदार यांचेकडून शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे आभार मानन्यात आले.




