राष्ट्रीय सेवा योजना समारोप,ध्येय निश्चित करुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा- नंदकुमार वाळंज

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दि. २२/०२/२०२५ लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य विज्ञान महानि‌यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर मु. पो. आंबवणे १६ ते २२ फेब्रुवारी २०२५ फ्रेबुवारी या ठिकाणी संपन्न झाले या शिबीराचे उद्‌घाटन महाविद्यालचे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख व आंबवणे गावचे उपसरपंच मा. निलेश मेंगडे यांच्या हस्त झाले.या शिबिरात विशेष उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये, वीर गड , कोराईगड या ठिकाणी स्वच्छता मोहीम, घेण्यात आली व गडावर जाणाऱ्या पायऱ्यांची डागडुजी व प्लास्टीक निर्मलन करण्यात आले. तसेच गावात प्रभातफेरी काडून स्वच्छता मोहिम घेण्यात आली ठिकठिकाणचे प्लास्टिक एकीकरण करून रिसायलिंग साठी पाठविण्यात आले. तसेच व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, लेक वाचवा लेक शिकवा, संविधान जनजागृती या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. त्याच प्रमाणे या सात (७) दिवशीय शिबीरात स्वयंसेवकांसाठी श्री. राजेंद्र दिवेकर , व्यक्तिमत्व विकास, डॉ. संदिप सोनटक्के, एन. इ. पी . २०२० , श्री. भारत बबन अंधश्रध्दा निर्मुलन, अपूर्व मराठे,लोणावळा परिसरातील स्थानिक इतिहास, शुभांगी भुजबळ, शिला साने. व्हय मी सावित्रीबाई बोलतेय, प्रा. संजय साळुंके संविधानाची ओळख. या वक्त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्याच प्रमाणे या शिबिराचा निरोप समारंभ दि. २२ फ्रेब्रुवारी रोजी संपन्न झाला. शिबीर समारोप प्रसंगी, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार वाळंज तर अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सर होते, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करत डॉ. पवन शिनगारे सर यांनी सात दिवसातील कार्यक्रमाची माहिती दिली व कु. नाझिया शेख, श्रुती शिंदे व निधी खांडेलवाल या विध्यार्थीनींचे मनोगत झाले. त्यांनी शिबिरामधील त्यांना भविष्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या कथनातून केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी गावामध्ये केलेल्या प्लास्टिक निर्मूलन कार्याचे कौतुक केले. तर आई वडिलांचे महत्त्व विषद करताना जिवना मध्ये पुढे जात असतांना आई वडिलांचे उपकार कधीही विसरु नका ह्याची जाणीव विध्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर पाण्याचे महत्व विषद करताना 2007 साली गावकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली व पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविली, तसेच दुषित वातावरणामुळे मानव जातीला संकट निर्माण होते. दुषित हवा (ऑक्सीजन ) घेण्याची वेळ येत्या काळामध्ये येऊ शकते, शेवटी मनोगता प्रसंगी स्वयंसेवकांना मोलाचा संदेश दिला. कि, ध्येय निश्चित करा, तरच प्रगतीकडे वाटचाल होईल. त्यांच्या नंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यानी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करताना, एन.एस एस (N.S.S) मध्ये राष्ट्र पुरुषांनी समाजासाठी मोलाचे दिलेले योगदान, तसेच स्वयं सेवकांना उद्देशून ‘मी’ पणा बाजुला ठेवून’कार्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सुसंवाद, मार्गदर्शनाचे महत्व व स्वतःचे आत्मपरिक्षण केले पाहिजे असे सांगितले, तसेच शिबीर यशस्वी झाल्याचे स्वयंसेवकांचे कौतुक केले. तसेच आंबवणे चे सरपंच सौ. सीता ताई कराडे यांनी गावासाठी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा गौरव केला या शिबिराचे आयोजन प्रा. श्री. धनराज पाटील (कार्यक्रम अधिकारी), प्रा. पवन शिनगारे, प्रा. भूषण गोंदके सर यांनी केले होते तर निरोप समारंभाचे सूत्रसंचालन सुजल शेलार याने केले.या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य. विलास पाटील सर, कानिष्ठ विभाग प्रमुख ऍनि वर्गिस, वाळंज महाविद्यालचे मुख्याध्यापक श्री. भटू देवरे , प्रा. साळुंखे, प्रा. अमर काटकर, प्रा. रोहन वर्तक इत्यादी मान्यवर उपस्थित असून मोठ्या व संख्येने एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page