एस काळे आणि कंपनीची यशस्वी ५० व्या वर्षाकडे वाटचालमराठी माणसाच्या कष्ट आणि कर्तुत्वाला सलाम


मावळ मराठा न्यूज :- पुणे ,मराठी माणूस व्यवसायात मागे आहे, व्यवसाय करावा तर मारवाडी गुजराथी यांनीच,असे साधारण बोलले जाते.परंतु मराठी माणसाने जर ठरवले आणि कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असल्यास तो देखील यशस्वी होवू शकतो हेच पुण्यातील सुरेश जगन्नाथ काळे यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने दाखवून दिले. त्यांची एस काळे आणि कंपनी हे मूर्तिमंत उदाहरण.नुकताच पुणे येथील एस काळे आणि कंपनी या कंपनीचा वर्धापन दिन दिनांक १५ मार्च २०२३ रोजी साकार झाला या कंपनीचे मालक व सर्वेसर्वा श्रीयुत सुरेश जगन्नाथ काळे यांनी ही कंपनी सवकष्टाने साकारली तेव्हा एक छोटे रोप, त्याचा जेव्हा आज वटवृक्ष झालेला दिसतोय.या कंपनीमध्ये काम करणारे कामगार, कंपनीला साथ देणारे व्यापारी वर्ग,आर्किटेक, इंटिरियर डिझायनर यांची सुद्धा कंपनीच्या भरभराटीस साथ लाभली. इथे अजून एक गोष्ट सुचित करावीशी वाटते की श्रीयुत सुरेश काळे यांनी सन १९७३ मध्ये घरची परिस्थिती अत्यंत हलाखीत असताना आपल्या भावांना पुण्यामध्ये बोलूवुन कंपनीचे भागीदार बनवले व २०१६ मध्ये प्रत्येकाला कंपनीचे स्वतंत्र दालन निर्माण करून दिले. यावेळेस कंपनीचे संस्थापक सुरेश काळे यांनी सांगितले की सदर कंपनीच्या कामकाजाला मी दिनांक १५ मार्च १९७३ रोजी स्वबळावरती सुरुवात केली. कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांना खूप अडीअडचणींना तोंड द्यायला लागले, काही वेळेस तर ऑर्डर्स घेण्याकरता सायकल वरून प्रवास केला व कंपनीसाठी ऑर्डर्स मिळवत गेले तसेच सायकल वरून ऑर्डर्स पूर्ण करत गेले . ते पुढे म्हणाले की, आज हे स्वप्न साकार करताना आम्ही प्लाईवुड, वेनियर्स, लेमिनेट्स विकता विकता आता मॉड्यूलर किचन आणि फ़र्नीचर चे काम सुध्दा करतो.एस काळे आणि कंपनी या कंपनीचे स्वतःचे नारायण पेठ, पुणे येथे २००० स्क्वेअर फुट चे शोरूम आहें. २०१० साली या कंपनीने भारतातील पहिली शोरूम ऑन हिल्स ही गाड़ी लॉंच केली होती जी ग्राहकांना त्यांच्या साईट वर जाऊन सिलेक्शन करण्याची सोय देत होती




