खाजगी वाहन चालकांना वर्तन प्रशिक्षणाची गरज परिवहन विचारवंत सूर्यकांत मुळे यांचे परखड मत



मावळ मराठा न्युज नेटवर्क -मानवाची निर्मिती मानवाच्या गरजा मानवाने साध्य केलेली प्रगती व त्याच्या अनुषंगाने प्रस्थापित झालेली आपली शासन व्यवस्था त्यानुसार काही शासकीय सेवेत किंवा त्यासंबंधीत वाहतूक उद्योगात काम करणाऱ्या संबंधित वाहनचालकांना काही प्रमाणात आवश्यक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे परंतु मोठ्या प्रमाणात एकंदरीतच खाजगी क्षेत्राकडे येणारा वाहनचालक त्याची पार्श्वभूमी त्याची गरज त्याची निर्मिती एकूणच लक्षात घेता त्यांना त्यांच्या वर्तनाविषयी आवश्यक प्रशिक्षण वाहन चालवण्याचा परवाना देईपर्यंत कुठेही दिसून येत नाही म्हणूनच वैज्ञानिक शोध वाहनाची आधुनिक निर्मिती संशोधनात्मक काम करून अद्यावत यंत्रणा निर्माण करून चालकांना वाहन चालवणे कितीही सुलभ केले तरी खाजगी वाहन चालक त्यांचे विचार त्यांची पार्श्वभूमी त्याची परिस्थिती त्याचा स्वभाव त्याची सवय बदलणे ही आवश्यक आणि गरजेची वाटते तरी शासन व्यवस्थेने खाजगी वाहन व्यवसायिकांना त्यांच्या चालकांना विशेष वर्तनाची प्रशिक्षण देणे त्यांच्या परिवर्तन घडवणे हे आवश्यक आणि बंधनकारक करावे त्यावर आधारितच प्रमाणीत प्रशिक्षित खाजगी वाहन चालवणाऱ्या चालकांना परवाना देण्याआधी करावे त्यामुळे वाहन अपघातावर नक्कीच नियंत्रण आणि राष्ट्रहिताला हातभार लागेल वाहन परवाना देताना त्याचे नूतनीकरण करताना त्याच्या अपघाती पार्श्वभूमीची माहिती घेणे आवश्यक आहे या कार्यासाठी एक राज्यस्तरीय यंत्रणा उभी करून खाजगी वाहन क्षेत्रातील परिवहन तज्ञांच्या सहभागाने उभारली पाहिजे व ती राबवली पाहिजे झालेल्या घटनावर अधिक चौकशी अधिक समित्या नेऊन त्याची चौकशी करण्यापेक्षा त्यांना देखावट आर्थिक मदत देण्यापेक्षा अशा संभाव्य घटना कशा टाळता येईल मानवी हानी टाळता येईल यासाठी राज्यकर्त्याने पुढे यावे सहभागी व्हावे आणि अशा योजना राबविण्यासाठी त्या यशस्वी करण्यासाठी या क्षेत्रातील आमच्यासारख्या अभ्यासू विचारवंताची मदत घ्यावी आम्ही निस्वार्थपणे राष्ट्रहितासाठी कटिबद्ध आहोत पण शासन विचारवंताची मदत घेण्यापेक्षा भरीव काम करून संभाव्य धोके टाळण्यापेक्षा आपल्या प्रसिद्धीसाठी गठित घटनांना मदत करून भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसून येत नाही म्हणूनच खाजगी वाहन चालकांना वर्तन परिवर्तनाच्या प्रशिक्षणाची गरज ही आवश्यक वाटते




