……ही महात्मा गांधी यांची लोणावळा नगरपरिषदेने केलेली विटंबना नाही का?


मावळ मराठा न्यूज,लोणावळा,लोणावळा नगरपरिषदेने कोट्यावधी रुपयांची सुसज्ज अशी इमारत उभी केली ही लोणावळाकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोणावळ्यात मंत्रालयासारखी सुसज्ज इमारत झाली त्यामुळे सुरेखा जाधव यांना मंत्रायायात येण्याची गरज नाही अशी स्तुती तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात केली होती. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी इमारतीच्या आवारातील महात्मा गांधी,संत गाडगे बाबा ,भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर महापुरूषांचे स्मारके सन्मान पूर्वक बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी प्रशासनाच्या पाठपुरावा करून स्मारकांची स्थापना करण्यास भाग पाडले.नंतर कोरोनाच्या काळात त्या कामाला परत ब्रेक लागला.एवढ्या उशिरा ने महापुरूषांची प्रतिष्ठापना करून देखील नगर परिषद प्रशासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना चष्मा न लावताच पुतळा उभारला हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान नाही का? असे माझ्या सारख्या साध्या,सामान्य पत्रकाराला वाटते. लोणावळा नगरपरिषद दोन दशकांपूर्वी पालिकेत झालेल्या भ्रष्ट्राचारामुळे अमरण उपोषणानंतर बरखास्त करावी लागली होती. तोच पालिकेचा भ्रष्ट्राचार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दिसू नये वा पाहू नये म्हणून तर त्यांना चष्मा पालिके ना लावला नाही ना?असा मनात विचार येतो. तरी लोणावळा नगरपरिषदेने महात्मा गांधी यांना चष्मा का लावला नाही? याचे कारण तरी जनतेला द्यावे.तसे काही नसेल तर राष्ट्रपुरुषांची विटंबना तरी लोणावळा नगरपरिषदेने थांबवावी तूर्तास इतकेच.....




