लोणावळा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न








मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक १३ मार्च २०२६ “विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्याने नाविन्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण गोष्टींमध्ये पारंगत व्हावे आणि शिक्षणाबरोबरच इतर कलागुणांना वाव द्यावा आणि आपला भविष्याचा मार्ग निवडावा असे” वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक मा. श्री. राजेंद्र सोनवणे नगराध्यक्ष, लोणावळा नगर परिषद लोणावळा यांनी प्रतिपादन केले. लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित, डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस.जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती.एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, वलवण, लोणावळा. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. दत्तात्रय पाळेकर, (उपाध्यक्ष, लो.ए.ट्रस्ट) हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. देवीदास कडू, उपनगराध्यक्ष, लोणावळा. नगर परिषद व मा. श्री. मिलींद वाळंज, सदस्य, जि. प. पुणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कु. प्रगती पवार हिने सादर केलेल्या बहारदार अशा गणेश वंदनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी गेल्या वर्षभरामध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा सादर केला त्याचबरोबर महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा मांडला. यावेळी मा. श्री देविदास कडू उपनगराध्यक्ष, लोणावळा नगरपरिषद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी नियमित चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी तत्पर असले पाहिजे असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर अँड. नीलिमा ताई खिरे सचिव, लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतानाच गुणवत्तेसाठी प्राध्यापक वर्गाने सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले. तसेच श्री. मिलिंद वाळंज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. श्री. दत्तात्रय पाळेकर म्हणाले की, आपण बदलत्या काळानुसार दृष्टिकोन बदलला पाहिजे, ध्येय निश्चित करून त्याची पूर्तता करण्यासाठी परिश्रमपूर्वक वाटचाल केली पाहिजे, त्याचबरोबर लोणावळा शहर व परिसरातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये हीच आमच्या ट्रस्टची धारणा आहे व त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे, श्री. नंदकुमार (बाबूजी) वाळंज, अँड. श्री. अजय भोईर सहसचिव, श्रीमती शैलजा फासे, श्री. सुनील ठोंबरे, श्री. दत्तात्रय येवले खजिनदार, लो.ए.ट्रस्ट, पत्रकार श्री. विशाल पाडाळे, तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या मा. सौ. नेहा पाळेकर, लोणावळा नगर परिषदेच्या शिक्षण समिती सभापती मा. सौ. दीपा अग्रवाल, नगरसेवक मा. जाकिर खलिफा, मा. वसुंधरा दुर्गे, मा. नारायण पाळेकर, मा. सना चौधरी, मा. सोनाली ताई मराठे, मा. नीलिमा अंभोरे, मा. गायत्री ताई रिले तसेच लोणावळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मा. श्रीकृष्ण वर्तक, रोटरी क्लबच्या अध्यक्षा मा. विजया कल्याण, मा. नितीन कल्याण, मा. रवींद्र कुलकर्णी, मा. प्रमोद देशमुख, कॅनरा बँकेचे मा. पवनजी कुमार, मा. योगेश खंडेलवाल, मा. मोनाली कुलकर्णी उपस्थित होते तर लोणावळा परीसरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक वर्ग, माध्यमांचे प्रतिनिधी बांधव उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, लोणावळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंखे, डॉ. पवन शिनगारे, प्रा.ज्ञानदेव रणशूर, प्रा. पराग कुलकर्णी, श्री.विशाल पाडाळे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. विलास पाटील (स्नेहसंमेलन प्रमुख) यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.



