थोरण–खंडशी ग्रामस्थांचा टाटा कंपनी विरोधात एल्गार!“एकही झाड तोडू देणार नाही, आम्हाला रोजगार नको,आमचा सह्याद्री हवा!”

मावळ मराठा न्युज -थोरण–खंडशी (मावळ) : शिरोटा वन बचाव संघाच्या वतीने काल थोरण–खंडशी गावात आयोजित करण्यात आलेली जनजागृती बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीला गावातील ग्रामस्थ, महिला आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘टाटा गो बॅक!’ अशा घोषणा देत टाटा कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध नोंदवला. सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे, जंगलाचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.विशेष म्हणजे, आगामी काळात जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली. एकही झाड तोडू देणार नाही, जंगल वाचवण्यासाठी शेवटपर्यंत उभे राहू, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.ग्रामस्थांचा स्पष्ट संदेश आहे की, आम्हाला विकासाच्या नावाखाली जंगलाचा विनाश नको. रोजगाराच्या आश्वासनांपेक्षा आमच्या पुढील पिढ्यांसाठी निसर्ग, पाणी, जंगल आणि सह्याद्री अधिक महत्त्वाचा आहे.आम्हाला रोजगार नको, आम्हाला आमचा सह्याद्री हवा!ही केवळ एका गावाची लढाई नाही, तर मावळच्या निसर्गसंपदेच्या संरक्षणासाठी उभा राहिलेला जनआवाज आहे.एकच निर्धार, एकच लढा!🌳 एकही झाड तोडू देणार नाही! 🌳 जंगल वाचवू, सह्याद्री वाचवू 🌳 मावळचा निसर्ग वाचवू! शिरोटा वन बचाव संघ – मावळ

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page