मावळ तालुका तायक्वादो असोसिएशनचा २६ वा वर्धापन दिन लोणावळ्यात उत्साहात साजरा




मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळ तालुका तायकोदो असोसिएशनच्या २६ व्या वर्धापन दिन भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे सचिव हर्षल होगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थीचे शैक्षणिक नविन वर्ष चालू झाले आहे सर्वांना अभ्यास करा मोठं व्हावा शालेय शिक्षण घेता असताना स्वसंरक्षणाचे धडे सुध्दा सर्व विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे पालकांनी आपल्या संस्थेवर विश्वास दाखवला आणि यातून आपल्या संस्थेचे विद्यार्थी आतापर्यंत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक गोल्ड मेडल,सिल्वर मेडल आणि ब्रांझ मेडल मिळवली आहे वर्षभरात ज्याच्या स्पर्धा झाल्या त्याच्या स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले त्याप्रसंगी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे सर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी अमित दळवी, अंकुश शिर्के,सदू मांडेकर,गुरकुल शाळेच्या शिक्षिका वंदना पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शितल तारे, यश बोभाटे, शिवानी तिकोन यांनी केले.२०२३ ऑलम्पिक वीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार तसेच शिव छत्रपती गौरव पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांना मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने बोभाटे सरांचा विशेष सत्कार करण्यात आला.




