स्वानंद महिला संस्था,पिंपरी चिंचवड श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखेतर्फे पुरस्कार आणि चर्चा सत्र संपन्न

मावळ मराठा न्युज -ब्रह्मचैतन्य सभागृह,चिंचवड भगवान महावीर जन्म कल्याण,बाबासाहेब आंबेडकर जन्म जयंती व या दोन महान विभूतीचे जन्म जयंतीचे औचित्य साधून समाजामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या सारे जीवन समाजसेवेसाठी परिवारासाठी समर्पित करणाऱ्या महिलांना स्वानंद संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त “माता त्रिशला माई रमा “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम बिजलीनगर येथील ब्रह्मचैतन्य हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर,नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, जैन कॉन्फरन्स जैन भवनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, तसेच संस्थेच्या संस्थापिका व राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया व स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब यांच्या गरिमाभरी उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्काराचे मानकरी १)सौ.ताराबाई मदनलाल बाकलीवाल २)सौ लताजी अशोकजी पगारिया ३)केशरबाई हरकचंदजी भन्साळी यांना उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आली. यावेळी “स्वानंदी जगण्याची कला” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले .या चर्चासत्रामध्ये नकारात्मकता दूर ठेवून सकारात्मकतेने जीवन कसं जगावं यावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे चर्चासत्र कीर्तनकार डॉक्टर श्वेता राठोड, शुभांगी कात्रेला यांनी रंगविले. महिलांनी आपल्या जीवनाचा पट अतिशय सुंदरतेन मांडला. उपस्थित असणाऱ्या महिलांना स्व कडे पाहण्यासाठी प्रवृत्त केले.या चर्चासत्रात उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका आशाताई सूर्यवंशी प्रा सुरेखा कटारिया, शोभा बंब यांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा बंब यांनी केले नवकार कंचनमाला बाफना, सुनिता कांकरिया यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी कासारवाडी संघाचे अध्यक्ष विलासजी पगारिया दापोडी संघाचे अध्यक्ष दिलीपजी भन्साळी ,पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयासजी पगारिया, पारस भवनचे अध्यक्ष देवेंद्रजी बाकलीवाल, जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य चंद्रकांतजी भन्साळी, पुणे जिल्हा विभागाचे जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश कटारिया, तपस्वी प्रवीण जी भन्साळी स्वानंदच्या माजी अध्यक्ष सुनिता देसर्डा ,राजश्री बिनायकिया , कंचनमाला बाफना,जैन सोशल ग्रुपच्या मंजू धोका तपस्वी मंगलताई भन्साळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्यक्रमाचे आयोजन संयोजन सविता बाँटिया, मनीषा चोरडिया, अलका कुंकूलोळ, रोहिणी भटेवरा, अंजली वर्टी, पायल ललवाणी, शलाका कटारिया यांनी संयोजन केले. या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर वैशाली लोढा यांनी मानले .कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन शुभांगी कात्रेला यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page