शिवजयंती आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त वडगाव येथे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान


मावळ मराठा न्यूज :- जांभूळ गावातील परिक्रमा आधारभूत सामाजिक सेवा कार्य न्यास या संस्थेमार्फत परिसरातील कर्तृत्ववान महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. परिक्रमा आधारभूत सामाजिक सेवा कार्य न्यास या संस्थेमार्फत वर्षभर विविध घटकांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. दहा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त जांभूळ गावातील कर्तुत्ववान महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉ.पद्मजा घोरपडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नागसेन ओव्हाळ, प्रमुख पाहुणे प्रा. प्रसन्ना भिडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ. पद्मजा घोरपडे यांनी केले उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, शेवंतीची रोपे व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कर्तुत्वान महिलांचा सन्मान करताना प्रत्येकी एक हजार रुपये रोख व शाल श्रीफळ व शेवंतीची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योजिका रेखा अमोल धिडे. कल्पना भाऊसाहेब थोपटे, संगीता शांताराम गराडे, सीमांतिनी फुड्स महिला उद्योजक इत्यादी महिलांचा सन्मान कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका प्रसन्ना भिडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसन्ना भिडे यांनी महिला उद्योजकांना संबोधित करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर समकलीन महिला यांनी त्या काळाच्या रूढी परंपरा त्यांच्या विरोधात जाऊन काम केले. त्या जिद्द व ध्येयापासून कधीही विचलित न होता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांनी आपले कार्य सिद्ध केले याविषयीची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नागसेन ओवाळ यांनी लोकत्तर पुरुष कशा पद्धतीने जीवनात संघर्ष करून निर्माण झाले याची माहिती देऊन संघर्ष शिवाय कोणतेही उद्योजिका शक्य नाही आणि त्यामुळे कठोर परिश्रम व जिद्द या जोडीने जीवनात यशस्वी होता येते.याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त सुदेश पगारे यांनी केले. उपस्थित सर्व महिला व पाहुणे यांना संस्थेतर्फे अल्प उपवाराची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला गावातील महिला अर्चना प्रवीण नवघणे, सोनाली सुनील देशमुख, स्वाती नवनाथ काकरे, शितल बाळासाहेब काकरे,उषा रमेश काकरे,दिपाली रोहिदास गराडे, आशा सुनील जांभुळकर, राजश्री राजेश जांभुळकर, उर्मिला प्रवीण गाडे, नारायण जांभुळकर, या महिलांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




