लोणावळ्यात शिवसेना शिंदे गटात अनेक उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा शहरातील उबाठा व मनसे तीन पदाधिकाऱ्यांचा मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर व महिला आघाडी शहर संघटिका मनीषा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश संपन्न झाला.मनसे लोणावळा शहर सरचिटणीस निखिल सोमण, उबाठा युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, उबाठा रेल्वे मा. प्रभागप्रमुख राजूभाऊ चव्हाण, उबाठा शाखाप्रमुख प्रमोद लोहिरे, उबाठा शाखाप्रमुख संतोष दरडे, मनसे शाखाप्रमुख परेश वावळे, मा शाखाप्रमुख प्रसाद कन्नन, विवेक शिळवने, आकाश खंडेलवाल, प्रमोद फाटे, आतिष भांगरे, दिलीप दुबे,चंद्रकांत भंडारी,सुनील निकम, राहुल कांबळे, अजय वाघमारे, ललित कदम, स्वप्नील गायकवाड, दिपाली शिरबेकर, आशाताई कदम आदी आजी माजी पदाधिकारी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश संपन्न झाला..यावेळी उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल हुलावळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, खंडू शेलार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page