वरसोली ग्रुप ग्रामपंचायतच्या नारायण राजाराम कुटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड









मावळ मराठा न्युज -वरसोली,वरसोली ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच मंदा नामदेव पाटेकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी उपसरपंच पदी नारायण भाऊ राजाराम कुटे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी सरपंच संजय खांडेभरड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रुप ग्रामपंचायत वरसोली च्या ग्रुप ग्रामपंचायत वरसोली च्या उपसरपंच पदी नारायण भाऊ राजाराम कुटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मंदा नामदेव पाटेकर यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा आल्यानंतर नारायण राजाराम कुटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी त्यांचे ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच संजय खांडेभरड आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी नारायण भाऊ राजाराम कुटे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.



