लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा ने केला शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान








मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा सोमवार, दिनांक १६.०९.२०२५,नांगरगाव येथील संवाद शाळा, लोकमान्य टिळक विद्यालय क्रमांक ८,वळवण येथील महात्मा गांधी विद्यालय क्रमांक ७,महिला मंडळ हाॅल येथे योगा टिचर ह्यांचा शिक्षक दिनाचे ओचित्य साधून सर्व शिक्षकांचे प्रमाणपत्र देउन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळेस लायंन्स क्लब लोणावळाच्या अध्यक्षा लायन कांता पोपट ओसवाल,लायन निराली देवेंद्र नाळेकर,लायन अश्विनी मंगेश कदम, लायन डाॅ. पोपट ओसवाल,डिस्टिक्ट मेडिकल अँक्टिविटी चेअरमन आणि नंदकिशोर खंडेलवाल उपस्थित होते. लायन दिपाली विरल गाला व लायन रिम्पल पटवा है ॲक्टिवीटी चेअरमन सुध्दा उपस्थित होते.वलवन शाळेचें मुख्याध्यापक,चंद्रकांत पारधी, सौ सविता शिंदे,नीलम मॅडम,नांगरगाव च्या शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पवार,स्वाती येवले, शुभांगी जाधव,संवाद शाळेच्या प्राची पत्की,मीरा हवालदार,मानसी लपालीकर,नसीम मुल्ला,सारिका पाळेकर,आशा लपालिकर,परमेश्वरी दामले,सूक्ष्म योगा फौंडेशन चें पंकज शर्मा योगा टीचर विपरा चौहान, अनिता मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.



