लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांच्या २०२५-२६ कार्यकाळातील अध्यक्षा लायन कांता पोपट ओसवाल आणि पदाधिकारी यांचा निरोप समारंभ संपन्न









मावळ मराठा न्यूज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा यांच्या २०२५-२६ कार्यकाळातील अध्यक्षा लायन कांता पोपट ओसवाल,सचिव लायन निराली देवेंद्र नाळेकर आणि खजिनदार लायन अश्विन मंगेश कदम यांचा निरोप समारंभ ब्लिस निर्वाणा कॅफे येथे आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.अध्यक्षा लायन कांताजी ओसवाल यांनी उपस्थित सर्व लायन सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या चार सदस्यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून देण्यात आला. तसेच सर्व सदस्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.कार्यक्रम उत्साह, मैत्रीभाव आणि आनंदाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. सर्व सदस्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. लायन कांता जी आसवाल ह्यांनी २०२६-२७ च्या नवीन पीएसटी टीमला शुभेच्छा दिल्या.ह्या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल, लायन डॉ. पोपट ओसवाल, सचिव लायन निराली नाळेकर, लायन देवेंद्र नाळेकर, खजिनदार लायन अश्विनी कदम, लायन मंगेश कदम, झोन चेअरमन एम जे एफ लायन देवल पारेख, चार्मी पारेख, लायन विरल गाला, लायन दीपाली गाला, लायन डॉ. लीना पॉन, आशीष पॉन, लायन झुबेर शम्सी, लायन शाजीया शम्शी, लायन अभय राठोड, लायन मनोज लुंकड, लायन प्रितम लुंकड, लायन प्रकाश जैन, लायन कोमल जैन, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन जयश्री सुराणा, लायन रंजु लुणावत,लायन वीरेंद्र पारेख, सीमा पारेख,लायन रोहित, लायन मनीषा थोरात, लायन राजु राजपूत, लायन हेमा राजपूत तसेच नविन मेंबर अमेय बारटक्के, श्री आणि सौ कैलाश माळी उपस्थित होते.



