पवना धरण परिसरामधील अतिक्रमणांवर कारवाई,पण त्या बंगल्यावर काम करणाऱ्या शेकडो महिला,तरुण बेरोजगार होणार त्यासाठी प्रशासन काय करणार?








मावळ मराठा न्युज – (श्रावणी कामत ) पवनानगर,पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार करण्यात आली आहे. आपटी आणि धामणदरा परिसरातील बंगल्यांवर ही कारवाई सुरू आहे.परिसरातील अतिक्रमणांबाबत मालकांना नोटिसा दिल्या होत्या आणि त्यांना स्वतःच्या मालमत्तेतील वस्तू बाहेर काढण्याची सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु शेकडो स्थानिक बेरोजगार यांना हाताला काम मिळत होतं ते मात्र या कारवाई ने संतप्त झाले आहेत. आम्हाला दोन पैसा यातुन मिळत होता महिला,तरुण यांचे हाताचे काम गेल्याने त्यांनी मात्र आपली संतप्त भावना मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात पाच बंगल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा मुख्य उद्देश जलसंपदा विभागाच्या संरक्षणाखाली असलेल्या जमिनीवर झालेली अतिक्रमणे काढणे हा आहे.जलसंपदा विभागाने पूर्वीही करावाई केली होती. यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी माणिक शिंदे, शाखा अभियंता रजनीश बारिया,शीतल पठारे, वैभव देशमुख आणि इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. जलसंपदा विभाग पूररेषेखालील संपूर्ण अतिक्रमणे काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांची मोठी कुमक मागवून कारवाई सुरूच राहिल असे अधिकारी यांचे कडून सांगण्यात आले.



