३१ ऑक्टोबर,राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोणावळा शहर पोलिसांकडून एकता परेडचे आयोजन







मावळ मराठा न्युज -लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या संकल्पनेतून एकता परेडचे विशेष आयोजन करण्यात आले,याला लोणावलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशाचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वलभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त या उपक्रमाचे व एकता परेडचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.लोणावळा शहर पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भारत देश हा विविधता आणि सर्व धर्म समभाव असणारा देश आहे तोच संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्यावतीने करण्यात आले होते.
एकता मैदान या ठिकाणी सुरू असलेल्या एकता परेडचे थेट प्रक्षेपण लोणावळेकरांना पाहता आले. यावेळी लोणावळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,आजी माजी नगरसेवक आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



