*रिच ट्रस्ट,पुणे व सिल्व्हरी डॉन ट्रस्ट,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा नगरपरिषदेच्या विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

*मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात शुक्रवार (दि. 3 जुलै) रोजी रिच ट्रस्ट हडपसर, पुणे व सिल्व्हरी डॉन ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या लोणावळा माध्यमिक व उर्दू माध्यमिक तसेच शाळा क्रमांक तीन व शाळा क्रमांक पाच येथील विद्यार्थ्याना मोफत स्कूलबॅग,वह्या , कंपासपेटी, वॉटरबॉटल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बलकवडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बलकवडे सर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका म्हाळसकर मॅडम, अमिता जोशी मॅडम, शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमास रिच ट्रस्टचे डॉक्टर श्री.लोचनसाहेब, श्री.जितेंद्र मोहन व सिल्व्हरी डॉन ट्रस्ट यांच्यावतीने ब्रदर जॉर्ज, ब्रदर संदीप, ब्रदर मनोज, ब्रदर विश्वमोहन इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमजद पठाण सर यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बलकवडे सर यांनी केले.आभारप्रदर्शन उर्दू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सईद नल्लामंदु सर यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page