सुखकर्ता मित्र मंडळ,यमुनानगर तर्फे रक्तदान आणि विविध उपक्रम

मावळ मराठा न्युज -यमुनानगर,निगडी-दानात दान श्रेष्ठ रक्तदान सुखकर्ता मित्र मंडळ यमुना नगर निगडी किर्लोस्कर कॉलनी यांच्या वतीने २५ व्या रौप्य महोत्सवी गणपती महोत्सव निमित्ताने भव्य कास्य थेरपी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये ३० नागरिकांनी रक्तदान केले ८० जणांनी कास्य थेरपीचा लाभ घेतला. सुखकर्ता मित्र मंडळ नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत असते. यावर्षी विविध गुणदर्शन ,फन फेअर , कास्य थेरपी व रक्तदान शिबिर,संगीत खुर्ची,चित्रकला, रांगोळी ,मैदानी खेळ व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा. गजानन ढमाले व यमुना नगर मधून सर्व जेष्ठानी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद उपभोगला. यमुना नगर किर्लोस्कर कॉलनीतील सर्व बंधू भगिनींनी व लहान मुलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. मंडळाचे अध्यक्ष मा. गणेश तिवारी, उपाध्यक्ष ऋषिकेश कोंढाळकर ,खजिनदार अभिषेक वाळके, कार्याध्यक्ष कृष्णकांत खोल्लम ,सचिव भालचंद्र बागल व त्यांच्या सर्व टीमने अहोरात्र अथक परिश्रमाने हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. महाप्रसाद, सत्यनारायण महापूजा, बक्षीस समारंभ व मिरवणुकीने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page