व्ही.पी.एस इंग्लिश टीचींग स्कूल लोणावळा येथे उत्साहात पालखी सोहळा साजरा








मावळ मराठा न्युज – लोणावळा येथील व्ही.पी.एस इंग्लिश टीचींग स्कूल लोणावळा मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.गुरुवार दिनांक २३ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग व भजनांच्या सुरावटींसह पालखीची मिरवणूक काढून वारकरी परंपरेचा सुंदर अनुभव घेतला.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले. शाळेच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय संस्कृती आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन शाळेच्या सांस्कृतिक समितीच्या व्हर्जिनिया रॉइज व गिरिजा वाघमारे यांनी केले. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिकेत रासकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे,कार्यवाह डॉ.सतीश गवळी,सहकार्यवाह श्री.विजय भुरके यांनी या पालखी सोहळ्याचे कौतुक केले.



