हम होंगे कामयाब हे लक्षात घेऊन जीवनाची वाटचाल करा- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे










मावळ मराठा न्युज -राळेगणसिद्धी – सद्गुरु संस्कार मंदिर यांच्या नांदेड सिटी पुणे मधील पांडुरंगनाथ संगीत विद्यालयाची शैक्षणिक सहल, छत्रपती संभाजी महाराज समाधी वढु बु. रांजणखळगे निघोज व आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे गेली असता लोक आंदोलन चे दत्ताजी आवारी यांनी मुलांचे स्वागत केले तसेच मुलांनी आदरणीय जेष्ठ समाजसेवक मा. अण्णासाहेब हजारे यांचे घेतले आशीर्वाद.
कु. तेजल पवार, वैभवी नलबिलवार, राणी खांबले, काव्या शर्मा, माहेश्वरी मुडेवाड, यांनी आपली कला अण्णाजींच्या समोर सादर केली तर प्रणव आंग्रख , प्रांजल आंग्रख , सिद्धी चव्हाण , आर्या डांगे , सोहम गायकवाड , शौर्य गायकवाड , प्रणाली इंगळे , पद्मिनी जोशी , अक्षरा कोंडे ! तृप्ती खांबले , जयवीर कारंडे , जान्हवी कुंभार , सिया पाटोळे , कैवल्य पिंगळकर , वेदिका शिंदे , सई वांजळे , स्वरा वांजळे , सोहम कोंडे या सर्वांनी मिळून सुंदर भजन सादर केले , यात मा.आण्णांनी सर्वांचे भरभरून कौतुक केले.
सर्व मुलांच्या वतीने मा.अण्णाचा सत्कार करण्यात आला. अण्णाच्या शुभहस्ते मुलांना भारती विद्यापीठच्या २०२६ च्या सर्टिफिकेट चे वाटप करण्यात आले. नंतर अण्णाजींनी मुलांना मार्गदर्शन केले या प्रसंगी अजिंक्य देडगे पब्लिक स्कुल चे डायरेकटर श्री. राहुल मोकाशी, संगीत स्कुल च्या शिक्षिका सौ. रेणुका काळे सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण, ऋषिकेश ढगेकर, पांडुरंग माटे,आरुष मोकाशी व पालकवर्ग प्रतिनिधी सौ. गीतांजली वांजळे,देवयानी ढगेकर उपस्थित होते भेटी नंतर श्री. नाना आवारी यांनी मुलांना गाव व तेथील सर्वं प्रकल्प दाखवले सहलीचे आयोजन ऋषिकेश ढगेकर यांनी केले होते व श्री. निलेश दारवटकर व राधेशाम जगताप यांनी व्यवस्थापन केले.



