प्रा.रामकृष्ण मोरे लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय खंडाळा चा अभिनव उपक्रम,टाकाऊ वस्तूं पासून राख्या व रद्दी मधून पाकिटे

मावळ मराठा न्यूज़ खंडाळा :- टाकाऊ वस्तूं पासून राख्या व रद्दी मधून पाकिटे विध्यार्थ्यांन कडून तयार करण्यात आले. शालेय शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यात सुरू असलेल्या व्यावसाय शिक्षण योजनेतील उद्योजकता कौशल्य कार्यक्रम राखी व रद्दी मधून ऍनव्हलप बनवून विक्री करण्याच्या माध्यमातून अतिशय उत्साहाने शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम प्रमुख:कु.अमृता अनंत पाथरे मॅडम, उपप्रमुख:श्री.प्रमोद चव्हाण सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र दिवेकर सर यांनी विध्यार्थ्यांना राख्या बद्दल मार्गदर्शन केले, अतिथी जिल्हा को ऑर्डि नेटर अमोल शिंदे, खोपोली शाळेचे व्यावसायिक शिक्षक श्री. सुमीत पाटील, प्रमुख पाहुण्या प्राथमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती तारामती शिर्के , कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. सुनिता गावडे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश भ गायकवाड सदस्या सौ. छाया बनसोडे, सौ. संगिता बचाटे, शाळेचे वर्ग शिक्षक श्री. बोरसे सर, पालक संघाचे अध्यक्ष इतर पालक माजी विद्यार्थी व विध्यार्थ्यांनी ईत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page