अतिक्रमण काढून घेण्यासाठी नगरपरिषदेकडून नागरिकांना दोन दिवसांची मुदत,त्यानंतर अतिक्रमणवर पुन्हा धडक कारवाई सुरुच








मावळ मराठा न्युज –लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईने दोन दिवस ब्रेक घेतला होता,दोन दिवसात स्वतः हुन अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. कुमार रिसॉर्ट पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत लोणावळा नगरपरिषदेने कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता अचानक जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक व्यापारी आणि टपरी धारक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण लोणावळ्यात व्यापारी,टपरीधारक आणि नागरिक यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या या कारवाई विरोधात लोणावळा बंद पुकारण्यात आला. त्यानंतर व्यापाऱ्यांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात आली. पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम कडक पद्धतीने राबविण्यात येत आहे.नागरिकांना स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये नागरिकांनी अतिक्रमणे काढून न घेतल्यास सोमवारी लोणावळा नगरपरिषदेकडून सदरची अतिक्रमणे काढली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख मनोज पाटील यांनी केली होती.त्यानुसार पुन्हा सोमवार पासून लोणावळ्यात अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम आज तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. आज बाजार परिसरापासून ते भांगरवाडीच्या सुमित्रा हॉल पर्यंत ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख मनोज पाटील यांनी दिली. स्थानिक नागरिकांनी लोणावळा नगरपरिषद यांच्या वतीने होणाऱ्या या कारवाईचे स्वागत केले आहे.रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे अशी सर्व पक्षीय लोणावळा बंदच्या वेळी देखील सर्वांनी मते व्यक्त केली होती. परंतु तोंड पाहून करावाई नको किंवा हा माझा हा तुझा असं न करता सरसकट कारवाईचे सर्वच लोणावळेकरांनी स्वागत केले आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख मनोज पाटील यांनी देखील नागरिकांनी आम्हास सहकार्य करावे असे आवाहन केले.



