लोणावळा,खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतिने पोलिस,पत्रकार,पोलिस पाटील आणि चालक,मालक संघटनेचे सदस्य यांचा सत्यसाई कार्तिक यांचे हस्ते सन्मान

लोणावळा,खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतिने हॉटेल चंद्रलोक येथे लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील पोलीस प्रशासन पोलीस बांधवांनी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील वाहतूक कोंडी चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल वाहतूक चांगल्या प्रकारे नियंत्रित केल्याबद्दल पोलीस बांधवांचा पत्रकार बांधवांचा आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या पोलिस पाटील, तसेच संघटनेमध्ये ज्या चालक-मालक सदस्यांनी पंचवीस वर्षे संघटनेत राहून संघटना सक्षमपणे चालविली त्याबद्दल अश्या सर्व मान्यवरांचा लोणावला उपवभागाचे सहययक पोलिस अधीक्षक आय पी एस ,सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला . या वेळी लोणावळा, खंडाळा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल शेडगे,उपाध्यक्ष,संतोष ससाणे,लोनावला ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाल,माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, लोणावला शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. संजय पाटिल ,विशाल विकारी ,वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक सदाशिव पिरगणवार उर्फ सदा मामा, पोलिस कर्मचारी ,पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी सत्यसाई कार्तिक यांचे आभार मानत जूना मुंबई पुणे रोड दुहेरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून पर्यटकांना एक लाइन सुरळीत ठेवून दूसरी लाइन खरेदीसाठी थांबून खरेदी करू शकतील अशी मागणी केलि तर पत्रकार विशाल विकारी यांनी स्थानिक नागरिकांनी देखील स्वताला वाहतूक कोंडी होणार नाही याची सवय करुन घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर सत्यसाई कार्तिक यांनी स्वयसेवक ज्यानी पोलिसांना सहकार्य केले त्यामुळेच आम्ही हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू शकलो असे म्हणत त्यांचे कौतुक करत आभार मानले. लोणावला ग्रामीण चे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी कार्तिक साहेबांचे सुरुवाती पासून शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळेच हे शक्य झाल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश खोण्ड़गे यानी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page