मावळ वार्ता चे मुख्य वार्ताहर,फोटोग्राफर सुनील चव्हाण यांचे दुःखद निधन

मावळ मराठा न्यूज लोणावळा:- १२ जून २०२३,काल रात्री तळेगांव चाकण रस्त्यावर अवजड वाहनाची दुचाकीला धडक बसून सुनील चव्हाण यांचे निधन झाले ते ६१ वर्षांचे होते.मावळ वार्ता या व्हिडिओ बातमी पत्राचे ते अनेक वर्षे प्रतीनीधी म्हणून काम पाहत होते.त्यांच्या या दुःखद निधनाचा बातमीने संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. चव्हाण हे मितभाषी,सतत हसमुख असणारे व्यक्तिमत्व होते.मावळ वार्ता म्हणजे सुनील चव्हाण आणि सुनील चव्हाण म्हणजेच मावळ वार्ता एवढे ते आपल्या कामाप्रती एकनिष्ठ होते. त्यांच्या अचानक निधनाने मावळ वार्ता आणि चव्हाण परिवाराची मोठी हानी झाली आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच मावळ मराठा न्यूज परिवार कडून प्रार्थना.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page