लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पान टपरी व्यावसायिक यांची बैठक संपन्न्न ; १६८ प्रमाणे नोटीस आणि कडक सूचना








मावळ मराठा न्यूज -काही दिवसांपूर्वी लोणावळा शहरात पानटपरी धारक यांचे मार्फत होणाऱ्या अमली आणि नशा युक्त पदार्थ यांची होत असलेली विक्री आणि त्याचा अल्पवयीन मुला मुलींवर पडणारा प्रभाव त्यामुळे व्यसनाकडे वळणारी ही तरुण यावर शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांचेकडे लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती.पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी लगेचच गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक १७ मे २०२६ रविवार रोजी दुपारी ४ वाजता लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पान टपरी व्यावसायिक यांची बैठक पोलीस ठाण्यात घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये सर्व पान टपरी व्यावसायिक यांना बी एन एस एस कलम १६८ प्रमाणे नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व पान टपरी व्यावसायिक यांना पान टपरी मध्ये कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ तसेच गुंगीकारक नशा येणारे पदार्थ ठेवणार नाहीत, पान टपरी मध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध्य गुटखा विक्री, एम डी, बंदी असणाऱ्या सिगारेट विक्री करणार नाहीत,तसेच पानांमध्ये कोणतेही नशाकारक द्रव्य पदार्थ टाकून त्याची विक्री करणार नाहीत,अल्पवयीन मुला मुलींना (१८ वयाखालील मुला मुलींना) कोणत्याही प्रकारचा पान मसाला गुटखा किंवा आमलीजन्य पदार्थ देऊ नये तसेच शाळा विद्यालय कॉलेज परिसरात आपली पान टपरी लावता कामा नये शाळा कॉलेज पासून २०० मीटर बाहेरील परिसरात पान टपरी असावी,पान टपरी आस्थापना दिलेल्या वेळेत बंद झाली पाहिजे,पान टपरी आस्थापना दिलेले वेळेपेक्षा जास्त वेळ चालवीत असल्याचे आढळून आल्यास तसेच पान टपरी व्यवसाय रात्री उशिरापर्यंत चालवून त्यातून सदर ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अश्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.या बैठकीला एकूण ३५ पान टपरी व्यावसायिक उपस्थित होते. सदर बैठकीला लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पान टपरी व्यावसायिक कडक सूचना दिल्या आहेत.



