लोणावळ्यात ६ जुलैच्या पाऊसाने नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठी आर्थिक हानी; तर नांगरगाव परिसरातील औद्योगिक क्षेत्राला देखील मोठा फटका

मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळ्यात दिनांक ६ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टीचे रूप धारण केले. या अतिवृष्टीमुळे नागरिकांसह औद्योगिक क्षेत्राचीही मोठी आर्थिक हानी झाली.नांगरगाव परिसरातील सर्वच उद्योगांचे कामकाज ठप्प झाले. नांगरगाव येथील शहा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रस्त्यावर सुमारे चार फूट पाणी साचले होते. तसेच शहा इंडस्ट्रियल इस्टेटमधील आशा प्लास्टिक,ॲलेक्स ग्राइंड्स,प्रिव्ही कंपनी, शुभदा पॉलिमर्स, रिग्रो, जरिवाला आणि मोनिषा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या परिसरात सुमारे ३.५ ते ४.५ फूट पाणी साचले होते. मोनिषा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड चे फार नुकसान झाले. या पावसामुळे सर्व कंपन्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. त्यातच सलग तीन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम झाला,याची देखील शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page