केंद्र नि राज्य सरकार आमच्या हातात नाही,तसेच काम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही,तेच मी पाहतो-शरद पवार

मावळ मराठा न्युज :- पुणे,लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागात भेटीगाठी दौरा केला आहे. दरम्यान शरद पवार तीन दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. येथील ग्रामीण भागात जाऊन दुष्काळग्रस्त नागरिकांच्या व्यथा ते समजावून घेत आहेत.बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर येथील नागरिकांच्या दुष्काळी प्रश्नांसंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिले आहे. बुधवारी त्यांची बारामतीच्या नीरावागजमध्ये छोटेखानी जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी बारामतीच्या ग्रामीण भागांतील जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. नीरावागज येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर त्यांच्यासमोरील अनेक त्यांच्या पुढे येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. दुष्काळी परिस्थिती,पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच शेतीसमोरील आव्हाने असे विविध मुद्दे नागरिकांनी शरद पवार यांच्यासमोर मांडले. त्यानंतर केलेल्या भाषणात पवार यांनी ,“आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जसे आपण केले तसेच काम आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही, तेच मी पाहतो. असा विश्वास व्यक्त करत एकदा का राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही” असे आश्वासन शरद पवार उपस्थित शेतकऱ्यांना दिले. लोकसभेत घवघवीत यश मिळवून त्यांनी सामान्य जनतेशी असलेली नाळ अजून घट्ट करण्यासाठी राज्यतील दौरे सुरु केले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page