*पिंपरी चिंचवड शहराचे पैलवान काळुराम लांडगे यांचा सातारा येथे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मान*







मावळ मराठा न्युज (दि.०६.०९.२०२६)सातारा जिल्ह्यात वाई येथे रमेश गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय मध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्लोबल फाऊँडेशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.राज्यभरातुन आलेल्या पुरस्कार्थींमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे पैलवान काळुराम लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय केलेले अतुलनीय कार्य , दीर्घकालीन समर्पित सेवा , समाजातील अनेकांना निस्वार्थपणे दिलेली प्रेरणा आणि आदर्शवत जीवनयात्रेची दखल घेऊन ग्लोबल फाऊँडेशन आयोजित द्बितीय वर्धापन दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट समजला जाणारा राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार २०२६ अंतर्गत ” जीवनगौरव पुरस्कार ” सन्मानीय प्रमुख अतिथी सिने अभिनेते ( देवुळबंद २ – द्बितीय प्रमुख भुमिका,नवनेव BSc Agri – सहाय्यक भुमिका,लाखात एक आमचा दादा – भुमिका खलनायक ) श्री.अतुल कुडले सर ,सुप्रसिद्ध अभिनेते (पटकथा लेखक , संवाद लेखक,दिग्दर्शक,निर्माता,सामाजिक कार्यकर्ते ) श्री.तेजपाल वाघ सर,आनंदी जीवन फाऊँडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोशीन पठाण,विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक श्री.सत्यजित माने देशमुख सर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र ,मानाचा फेटा ,शाल व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते श्री.तेजपाल वाघ सरांनी पुरस्कारर्थींना अध्यक्षीय भाषणामध्ये मार्गदर्शन करताना म्हणाले की समाजाच्या विकासाची खरी ताकद ही केवळ मोठ्या योजनांमध्ये नसते,तर त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणार्या माणसांमध्ये असते .समाजातील गरजु , वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण,संस्कार आणि आधार निर्माण करण्याचे कार्य करणार्या व्यक्तींचे योगदान निश्वितच प्रेरणादायी असते.यावेळी ग्लोबल फाऊँडेशनच्या संस्थापाक अध्यक्षा मा.सौ.ज्योती जाधव व त्यांच्या टीमचे सर्व सभासद उपस्थित होते.यावेळी राज्यभरातुन आलेल्या एकुण ६० पुरस्कारर्थींना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पुरस्कार्थी,त्यांचे नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.कार्यक्रम संपुर्ण पार पाडण्यासाठी व सुत्रसंचालन श्री.शशिकांत कोचळे सर व त्यांच्या टीमने भरपुर प्रयत्न केले.



