लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिला बचत गट उत्पादित वस्तू विक्री व खाद्यपदार्थ महोत्सव २०२६चे उदघाटन








मावळ मराठा न्युज – लोणावळा,महिला बालकल्याण विभाग,दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत लोणावळा नगरपरिषद महिला बचत गट उत्पादित वस्तू विक्री व खाद्यपदार्थ महोत्सव २०२६ चे उदघाटन नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे उपनगराध्यक्ष देविदास कडू यांचे हस्ते आणि , महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वप्ना अतूल कदम उपसभापती, महिला व बालकल्याण समिती सौ. भाग्यश्री महादेव जगताप,सदस्या सौ. लक्ष्मी नारायण पाळेकर,सौ.वैशाली सुनील मोगरे,सौ. वसुंधरा नितीन दुर्गे,सौ. रेश्मा अर्जुन पाठारे,सौ. नयना योगेश पैलकर,सौ. अनिता संदीप आंबुरे,नगरसेविका गायत्री रिले,नगरसेवक दत्तात्रय येवले,नगरसेविका सना चौधरी लोणावळा नगरपरिषद, अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आले.यावेळी सर्वांनी लागलेल्या प्रत्येक स्टॉल ला भेट देऊन नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपनगराध्यक्ष देविदास कडु यांनी खाद्य पदार्थचा आस्वाद घेतला.पुरंदरे हायस्कूल मैदान लोणावळा येथे भव्य स्टॉल लावण्यात आले आहेत.स्थानिक महिला उद्योजकाना प्रोत्साहन मिळावे,महिला सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आणि सर्व नागरिकांना जाहीर आवाहन त्यांनी केले आहे की यात जास्तीत जास्त संख्येने महो त्सवास भेट देऊन सहभागी महिलांना प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन महिला बालकल्याण समिती समिती सभापती स्वप्ना अतूल कदम आणि उपसभापती, सौ. भाग्यश्री महादेव जगताप यांनी सांगितले.महिला बचत गट उत्पादित वस्तूंची विक्री व खाद्यपदार्थ महोत्सव दिनांक १४/०३/२०२६ व १५/०३/२०२६ रोजी दोन दिवस असणार आहे.दिनांक १५/०३/२०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात समूह नृत्य,प्रतिष्ठित महिलांचा सन्मान,बक्षीस वाटप,आभार प्रदर्शन आदी कार्यक्रमाचा समावेश आहे.



