सौरभभैय्या मेहता यांच्या स्वर्ग आश्रमात रक्षाबंधन,तसेच बाल कलाकारांचा शास्त्रीय संगीताने उपस्थिताना खऱ्या स्वर्गाचा आनंद दिला










मावळ मराठा न्युज -दहिवली -कार्ला,मावळ येथील सौरभभैया मेहता यांच्या स्वर्ग आश्रमात रक्षाबंधन नाही तर परमेश्वराचे प्रेम म्हणजे रक्षा सूत्र कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले.यावेळी लोणावळ्यातील प्रसिद्ध तबला वादक मनोज कदम यांच्या शिष्य असलेल्या चिमुकल्या कलाकारांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम तबला वादनाचा सूंदर आणि देखणा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी सौरभ भाई मेहता यांच्या ईश्वरीय परिवाराकडून स्नेह मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि ईश्वरीय भोजचा देखील सर्वांनी आनंद घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पाळेकर यांनी केले.ईश्वरीय परिवाराकडून उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित भक्तांनी अतिशय सुंदर आणि अनोख्या संगीत सादरीकरणाचा आनंद घेतला.ताल,लय,सूर यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.सद्गुरु संगीत सदन विद्यालयातील गुणी चिमुकले विद्यार्थी कलाकार यांनी सुंदर असे सादरीकरण केले.तुकडे,मुखडे,गणेश परन, शिवतांडव स्तोत्र ‘अच्युतम केशवम’!या गीताने सर्वांची मने जिंकली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या ताल-लयीचा आणि पाश्चात्त्य संगीताच्या आधुनिक ध्वनीचा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला.यात सहभागी कलाकार तबला:-केतन केदारी, स्वराज काकडे, प्रथमेश काकडे, आरोही भोसुरे, आराध्या कोळसकर, मिहीर खराडे आणि तनवी गावडेकाहोन वाद्य :-वेदांत मालपोटे, आदिनाथ कडू, विवान भंडारी,प्रियांश अग्रवाल आणि अंशचंद्रा.सिंथेसायझर:-वेद साबळे.हार्मोनियम:-अथर्व नवले.तेजश्री गाडे हिने भक्तिरसाने ओतप्रोत असे सुंदर भजन सादर केले.हेमश्री पिसे-‘गरज गरज आज मेघ’ ही राग मेघ मल्हारवर आधारित बंदिश सादर केली. कार्यक्रमातील एक खास आकर्षण! तबला सोलो!हा सुंदर तबला सोलो भार्गवी मराठे हिने सादर केला.तबला सोलोसह त्या बासरीची सुंदर अशी साथसंगत चक्रवर्ती संतोष पाळेकर या चिमुकल्याने दिली.



